अनेक वेळा आपल्याला विविध रोगांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. त्यामागचं मुख्य कारण अनियमित आहार किंवा कामाच्या व्यापात आहाराकडे झालेलं दुर्लक्ष हे असतं. कोणताही थंड पदार्थ खाल्ल्यावर सर्दी, खोकला तर कधी-कधी तापही येतो. यामागचं आणखी एक कारण म्हणजे शरीरातल्या रोगप्रतिकारशक्तीचा स्तर कमी झालेला असतो. म्हणूनच तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. हाता-पायाला मुंग्या येणं, पेटका (Cramps) येणं, स्नायू आखडले जाणं (Muscle Contraction) यांसारखे त्रास अनेकांना जाणवतात.
असं होण्यामागे योग्य पोषणतत्त्वांची, जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण असू शकतं. ऐकून धक्का बसला ना? मग तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे, की कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे घडू शकतं.
हात पायाला मुंग्या येणाचे कारण
एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहिलो किंवा आपला हात किंवा पाय एका विशिष्ट स्थितीत काही काळ राहिला तर आपल्या हाताला-पायाला मुंग्या येतात. जीवघेणी कळ येणारा पेटका येऊ शकतो. बर्याच वेळा झोपेत एका कुशीवर जास्त वेळ झोपलो तर हातापायात गोळे येतात. हा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला असतो. हे असं होण्यामागचे कारण म्हणजे स्नायूंचं चलनवलन (Lack of Muscle Movement) न झाल्याने हाता-पायांवर ताण येतो, स्नायू आखडले जातात.
स्नायू आखडले गेल्याने रक्ताभिसरण (Uneven Blood Circulation) अनियमित होतं किंवा काही काळासाठी थांबतं; पण केवळ हेच कारण नसून शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील हे घडू शकतं.
👉 चिकू खाल्ल्याने तुमच्या शरीराला मिळतील एक-दोन नव्हे तर हे 5 फायदे, जाणून घ्या या फळाची खासियत 👈
आता आम्ही काय खावे ?
व्हिटॅमिन बी 1ची कमतरता भरून काढण्यासाठी धान्यं, फळभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, सुकामेवा आणि मांसाहार आदींचा आहारात समावेस असावा. तसं असल्यास हे व्हिटॅमिन विपुल प्रमाणात मिळतं.
व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता भरून काढण्यासाठी बटाटा, सुका मेवा, पौष्टिक धान्यं, कडधान्यं, मासे, चिकन यांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे. फक्त आंबट फळं किंवा पदार्थ वर्ज्य करावेत.
व्हिटॅमिन बी 9 ची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, राजमा, फळभाज्या, सगळी द्विदल धान्यं-डाळी, सूर्यफुलाचं बी आणि मासे यांचा आहारात समावेश करावा लागतो.
व्हिटॅमिन बी 12ची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर यांचं नियमित सेवन गरजेचं असतं. त्याशिवाय हिरव्या पालेभाज्या, चिकन आणि मासे यातही व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असतं.
व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी सुका मेवा आणि डाळी ह्यांचा आहारात समावेश करावा. तसंच हिरव्या पालेभाज्यांसोबत अन्न शिजवताना व्हेजिटेबल ऑइलचा वापर करावा.
हातापायात मुंग्या येणं, स्नायू आखडणं ही समस्या काही वेळाने ठीक होते. परंतु, आपल्यापैकी कुणालाही ही समस्या सतत उद्भवत असेल, तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणंच इष्ट आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार करावेत.
👉 दुधासोबत या 7 गोष्टी खाऊ नका, नाहीतर हे मिश्रण तुम्हाला आजारी पडेल. 👈
Is any source of vitamin B12 by purely vegetation