vihir anudan yojana
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देखील अनेक कौतुकास्पद योजना राबवल्या जात आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी सुद्धा अनुदान मिळत आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून एकापेक्षा अधिक योजना राबवल्या जात आहेत.
अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीसाठी अनुदान मिळते तर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान राज्य शासनाच्या या दोन्ही योजनांच्या आर्थिक निकषांमध्ये नुकताच बदल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने 1 ऑक्टोबरला याबाबतचा निर्णय घेतला असून आता या दोन्ही योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार रुपये, विद्युत पंप संच ४० हजार रुपये, वीज जोडणी आकारसाठी २० हजार, सोलर पंपसाठी ५० हजार, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणसाठी २ लाख, ठिबक सिंचन संचासाठी ९७ हजार तर तुषार सिंचन संचासाठी ४७ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना निश्चितच आता फायदा होऊ शकणार आहे. वाढत्या महागाईमुळे आधी विहीर खोदण्यासाठी दिले जाणारे अनुदान अपुरे ठरत होते.
मात्र आता अनुदानाची रक्कम वाढवली गेली आहे. म्हणून आता या योजनेला चांगला उदंड प्रतिसाद मिळणार असे जाणकारांनी म्हटले आहे.