भारतीय रिझर्व्ह बँक ही सगळ्यात मोठी सरकारी बँक (government bank) असून याच्यामार्फत गरजेवेळी अनेक निर्णय घेतले जातात. अशातच आरबीआयने आणखी एका बँकेचे लायसन्स रद्द केले आहे. ज्यामुळे या बँकेत खाते (bank account) असणाऱ्या खातेधारकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील द कपोल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Kapol Co-operative Bank) चे लायसन्स रद्द केले आहे. बँकेने सांगितले की, पुरेसे भांडवल आणि कमाई होण्याची शक्यता नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
The Kapol Co-operative Bank License Cancelled :
बँकेतून पैसे काढता येणार नाही
रिझर्व्ह बँकेने (Bank) एका वृत्तात म्हटले आहे की, लायसन्स रद्द झाल्यामुळे बँकेला बँकिग व्यवसायावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. ज्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि परत करणे समाविष्ट आहे.
बँक बंद करण्याचे आदेश
सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांनाही बँक बंद करण्याचे आदेश जारी करून बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे.
ग्राहकांना 5 लाख रुपये मिळतील
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, प्रत्येक खातेधारकांना विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल. यामध्ये बँकेच्या सुमारे 96.09 टक्के ठेवीदारांना त्यांची संपूर्ण ठेव रक्कम (Money) DICGC कडून मिळण्याचा अधिकार असेल.
ग्राहक फक्त ५०,००० रुपये काढू शकतात
आरबीआयने (RBI) म्हटले आहे की ठेवीदाराला त्याच्या एकूण ठेवींमधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.