pension yojana benefits
युनिफाइड पेन्शन योजना म्हणजेच एकात्मिक पेन्शन योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आहे.
याअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन दिली जाईल. ही रक्कम निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असेल.
25 वर्षांच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना ही पेन्शन मिळण्याचा अधिकार असेल. त्याचबरोबर पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला तोपर्यंत मिळणाऱ्या पेन्शनपैकी ६० टक्के रक्कम मिळेल.
याशिवाय कर्मचाऱ्याची सेवा 25 वर्षांपेक्षा कमी आणि 10 वर्षांपेक्षा जास्त असल्यास निवृत्तीवेतनाची रक्कम समानुपातिक वाटपाच्या आधारे निश्चित केली जाईल.
महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्याची कामाची वर्षे कितीही असली तरी, त्याच्या पेन्शनची किमान रक्कम 10,000 रुपयांपेक्षा कमी नसेल.
यूपीएसशी (unified pension scheme) कोण कनेक्ट होऊ शकते?
नवीन पेन्शन योजनेत (NPS) राहायचे की युनिफाइड पेन्शन योजनेत (UPS) सामील व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना असेल.
2004 पासून NPS अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या सर्वांना हे लागू होईल.
NPS च्या स्थापनेपासून जे लोक सेवानिवृत्त झाले आहेत आणि जे ३१ मार्च २०२५ पर्यंत निवृत्त होत आहेत ते देखील UPS च्या या सर्व लाभांसाठी पात्र असतील.
त्यांनी काढलेल्या पैशांची जुळवाजुळव केल्यानंतर त्यांना परत थकबाकी मिळेल.