Lek Ladki Scheme (Govt. Scheme) For Girls
राज्य शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु केली आहे. यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात १ एप्रिल आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलींना १ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला शासनाकडून ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे तसेच शिक्षणाबाबत (Education) त्यांना अधिक प्रोत्साहन देणे यासाठी सरकारने १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाहीये. त्यासाठी राज्य सरकारने ही योजना (Scheme) अधिक्रमित करुन नवीन लेक लाडकी योजना सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना (Girl) लागू होईल.
काय आहे लेक लाडकी योजना? कसा घेता येईल लाभ?
ई-श्रम कार्ड म्हणजे काय? पाहा बेरोजगारांना कसे अनेक फायदे मिळतात?
1. लेक लाडकी योजना काय आहे?
माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करुन राज्यात १ एप्रिल २०२३ पासू मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने येतील.
2. ही योजना कोणाला मिळणार?
योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ नंतर जन्मला येणाऱ्या मुलीला पैसे मिळतील.
3. कोणती कागदपत्रे आवश्यक?
या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला मुलीचा जन्मदाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, आई-वडिलांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि शाळेचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.
LIC ची उत्तम योजना, एकदाच गुंतवणूक करा, आयुष्यभर पेन्शन सुरू राहील