महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, पुढील 48 तास धोक्याचे, ऑरेंज अलर्ट शहरांची नावे पहा

IMD MONSOON FORECAST

पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे, शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे.

नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

हा मान्सून पूर्व पाऊस असेल तर पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून मुंबईत धडकणार असून त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळतील

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यात आहे

या काळात नुसता पाऊसच पडणार नसून महाराष्ट्रात वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका राहणार आहे.

मच्छीमारांसाठी सूचना

“9 ते 13 जून या कालावधीत उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि त्याच्या बाहेर 45 किमी प्रतितास ते 55 किमी ताशी वेगाने वाऱ्यासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

या काळात मच्छीमारांना उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ आणि बाहेर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. कालावधी,” आयएमडीने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

Leave a comment