आजच्या काळात एटीएम कार्ड ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. मोठी रोकड खिशात ठेवण्याऐवजी एटीएम कार्डमुळे लोकांना मोठी सोय झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, बँकेकडून तुम्हाला एटीएम कार्ड जारी होताच ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. याची माहिते फार कमी लोकांना असते. तसेच बँकाही ग्राहकांना अशी माहिती देण्यास टाळाटाळ करतात.
बिहार परिवहन विभागाचे सचिव संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, बँक ग्राहकाला एटीएम कार्ड जारी करताच, ग्राहकाला अपघात किंवा अकाली मृत्यूविरूद्ध विमा मिळतो. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार, तुम्हाला मिळणारी विम्याची रक्कम 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
परंतु माहितीअभावी एटीएम कार्डधारकाचा अपघात किंवा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळू शकत नाही.
ते म्हणाले की, एडीएम कार्डधारक अपघातानंतर एक महिन्याच्या आत संबंधित बँकेच्या शाखेत अर्ज करू शकतो. परिवहन विभागाच्या वेबसाइटवरही दावा करण्याबाबतची माहिती उपलब्ध असेल. संजय अग्रवाल यांनी बँकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांच्या ग्राहकांना या सुविधेची माहिती द्यावी आणि त्याचा प्रचार करावा. जेणेकरून अपघातात बळी पडलेल्या किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना याचा लाभ मिळू शकेल.
कोणत्या एटीएम कार्डवर किती विमा?
एटीएम कार्डनुसार, अपघात आणि अकाली मृत्यू विमा उपलब्ध आहे. नियमानुसार, ग्राहक 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असावा. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते. क्लासिक कार्डवर 1 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये, ऑर्डिनरी मास्टरकार्डवर 50 हजार रुपये, प्लॅटिनम मास्टरकार्डवर 5 लाख रुपये आणि व्हिसा कार्डवर 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. दुसरीकडे, रुपे कार्डवर 1 ते 2 लाखांचा विमा उपलब्ध आहे.
जर एटीएम कार्डधारक अपघाताचा बळी ठरला असेल. ज्यामध्ये जर तो एक हात किंवा पाय गमावला आणि अपंग झाला तर त्याला 50 हजार रुपयांचा विमा मिळतो. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास 1 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाची तरतूद आहे.
विमावर क्लेम कसा करायचा?
एटीएम कार्डवर विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला संबंधित बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागेल. ज्यामध्ये एफआयआरची प्रत, उपचाराचे प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर विमा दावा काही दिवसात खात्यात येतो. दुसरीकडे मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या नॉमिनीला मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृताच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर विम्याचा लाभ मिळतो.