अचानक आधार कार्डची गरज लागली असेल तर, PDF कशी उघडायची ते जाणून घ्या फक्त २ मिनटात

 aadhar card download password in marathi

आपल्याकडे नेहमीच आधार कार्ड असणे आवश्यक नाही, परंतु तुम्हाला अचानक आधार कार्ड हवे असल्यास तुम्ही काय कराल? UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही Adhar card Download कराल असे तुम्ही म्हणाल, पण तुम्हाला माहिती आहे का की ई आधार Download केल्यानंतर 8 अंकी पासवर्ड आवश्यक असतोच?

या 8 अंकी पासवर्ड शिवाय तुमची ई-आधार कार्ड PDF फाईल उघडणार नाही, आता इथे प्रश्न पडतो, हा 8 अंकी पासवर्ड काय आहे? डाउनलोड केल्यानंतरही ई-आधार उघडत नसल्याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला हे कसे सहज शोधू शकता याबद्दल माहिती देऊ.


 प्रत्येक व्यक्तीचा पासवर्ड वेगळा असतो

UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) च्या अधिकृत साइटनुसार, जर तुम्ही डिजिटल कॉपी डाउनलोड केली किंवा आधार कार्डची ई-कॉपी म्हणा, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी पासवर्ड वेगळा आहे.

ई आधार पासवर्ड कसा शोधायचा

पीडीएफ फाईलचा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे. पहिल्या चार अक्षरांशिवाय तुमचा जन्म कोणत्या वर्षी झाला हे टाकावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुमचे नाव सुरेश कपूर असेल आणि तुमचे जन्म वर्ष 1992 असेल, तर तुमच्या ई-आधार कार्ड PDF फाइलचा पासवर्ड SURE1992 असेल. हा 8 अंकी पासवर्ड टाकताच तुमची PDF फाईल उघडेल.

 

1 thought on “अचानक आधार कार्डची गरज लागली असेल तर, PDF कशी उघडायची ते जाणून घ्या फक्त २ मिनटात”

Leave a comment