Cm krushi pump yojana
राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री’ सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली.
ही योजना नेमकी काय आहे आणि त्याचा लाभ नेमका कसा घेता येईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
सौरकृषीपंपाचे फायदे
- दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
- दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
- वीज बिलापासून मुक्तता
- डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
- पर्यावरण पुरक परिचलन
- शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
- औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष
शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.
5 एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 अश्वशक्ती सौर कृषीपंप व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 5 अश्वशक्ती व 7.5 अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.
यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.
अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.
वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
“धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.