ladki bahin yojana 2
महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा झाला आहे. यानंतर आता महिलांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, लाडकी बहिण योजनेतील 2100 रुपये कधी मिळणार?
याचदरम्यान आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी (2 जानेवारी 2025) पार पडली. या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेतील अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे.
यापार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
अर्ज सरसकट बाद होणार नाहीत पण ज्यांच्या घरी दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आधार कार्डची माहिती जुळत नसल्यास किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.