dassehra myths and facts
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा हा सण अतिशय शुभ मानला जातो. या सणाला विजयादशमी किंवा दशहरा या नावाने देखील ओळखले जाते.
दसरा हा सण प्रामुख्याने वाईटावर चांगल्याचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा करण्याची प्रथा आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता.
तर देवी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता. दसरा हा सण अतिशय शुभ मानला जातो.विजयादशमी हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
यंदा दसरा हा सण १२ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रुपात सोनं एकमेकांना दिले जाते.
दसऱ्याच्या दिवशी करा हे काम
दसऱ्याच्या दिवशी जयंतीला लाल कापड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. असे केल्याने संपत्ती वाढते. यासोबतच उत्पन्नाचे स्त्रोतही खुले होतात.
दसऱ्याच्या दिवशी सकाळी आंघोळ करुन मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली असेल तर त्याचे पाणी घरात शिंपडा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते
दसऱ्याच्या दिवशी व्यवसाय आणि करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळविण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करा. तसेच दुर्गा देवीला शमीची पाने अर्पण करा.
दसऱ्याच्या दिवशी दुर्गाअष्टमीला केलेले हवनातील भस्म घराभोवती शिंपडा. यामुळे नकारात्मकाता ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही.
दसऱ्याच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका
दसराचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणाशीही गैरवर्तन करु नका. कुणालाही मानाने किंवा शब्दाने दुखवू नका.
दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सुई, साखर किंवा मीठ कुणालाही देऊ नका.
प्रसाद म्हणून कोणी लवंगा दिल्यास ते घेऊ नका. तसेच या दिवशी पांढऱ्या रंगाचा प्रसाद कोणालाही देऊ नका. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होईल