सरकारी योजना उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठी बातमी दिली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. सरकारने या योजनेंतर्गत अनुदानात वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की “सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम 200 रुपयांवरून 300 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत वाढवली आहे.” या घोषणेमुळे योजनेंतर्गत नोंदणीकृत 9.59 कोटी लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. (lpg cylinder price news today)
PMUY (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना) म्हणजे काय?
भारत सरकार या योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शनसाठी सबसिडी देते. 14.2 किलो सिलेंडरसाठी 1600 रुपये / 5 किलो सिलेंडरसाठी 1150 रुपये दिले जातात. या रोख सहाय्यामध्ये हे समाविष्ट आहे:
सिलिंडरसाठी सुरक्षा ठेव – 14.2 किलो सिलेंडरसाठी 1250 रुपये, 5 किलो सिलेंडरसाठी 800 रुपये.
प्रेशर रेग्युलेटर – 150 रुपये एलपीजी नळी – 100 रुपये
घरगुती गॅस ग्राहक कार्ड – रु. 25
तपासणी/प्रतिष्ठापन/प्रदर्शन शुल्क – ७५ रुपये
याशिवाय, ऑइल मार्केटिंग कंपनीज (OMCs) द्वारे योजनेच्या लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्जाची सुविधा देखील प्रदान केली जाते. या कर्जामध्ये एलपीजी स्टोव्हचे शुल्क (1 बर्नर स्टोव्हसाठी रु. 565, 2 बर्नर स्टोव्हसाठी रु. 990) आणि कनेक्शनच्या वेळी मिळालेल्या पहिल्या LPG सिलिंडरची रिफिल किंमत समाविष्ट आहे.