farmer latest news in marathi today
आपल्या देशातील अनेक शेतकरी भाजीपालाची शेती करतात. भाजीपाला शेतीतून रोजचं चलन बळीराजाला मिळत असते. या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजना राबवणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे (Yojana) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतात पिकवलेले फळे आणि भाजीपाला थेट परदेशात पाठवू (export) शकणार आहेत.
भारतीय समुद्राच्या मार्गाने केळी, आंबे, डाळिंब आणि फणस सारखे फळ आणि भाजीपाला निर्यात केला जाणार आहे. सध्या हवाई मार्गाने फळे आणि भाजीपाला निर्यात केला जातोय. भाजीपाला आणि फळांचे उत्पन्न आणि त्याचे कमी प्रमाण ठेवावे लागते. दरम्यान, आपल्या शेतातील काकडी, भेंडी, पालक, मेथी परदेशातील बाजारात नेण्यासाठी काही प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत.
काय आहेत प्रोटोकॉल
या प्रोटोकॉलमध्ये भाजीपाला किंवा फळे निर्यात करण्याचा वेळ, शास्त्रीय पद्धतीने फळे पिकण्याची माहिती मिळणे. एकाच वेळी कापणी करणे आणि परदेशात भाजीपाला पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. दरम्यान हे प्रोटोकॉल वेगवेगळ्या फळांसाठी आणि भाजीपाल्यासाठी वेगळे असतील. समुद्रामार्गे भाजीपाल्याची निर्यात केल्याने फळे आणि भाजीपाला निर्यातीस प्रोत्साहन मिळेल.
याशिवाय निर्यात केल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण वाढेल तसेच त्यासाठी लागणारा खर्च कमी होणार आहे. कारण हवाई मार्गाने केल्या जाणाऱ्या निर्यातीमुळे त्या शेतमालाचे दर वाढत असतात. त्यामुळे परदेशातील बाजारात या फळांना तसेच भाजीपाल्याचे दर जास्त ठेवावे लागतात.
यामुळे तेथील बाजारात असलेला भाजीपाला तेथील लोकांना तुलनेने स्वस्त मिळतो. सध्या लवकर खराब होणाऱ्या शेतमालांची निर्यात हवाई मार्गाने केली जात आहे. परंतु या पिकांना समुद्राच्या मार्गाने परदेशात कशाप्रकारे पाठवले जाऊ शकते. यासाठी काही प्रोटोकॉल बनवण्यास सुरुवात केल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल दिली.