Gopinath Munde Shetkari Apghat vima yojana-2:
नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण उपयुक्त असणारी ही योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपघाती अनुदान दिली जाते….
या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Gopinath Munde Shetkari Apghat vima yojana-2
मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 19 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आला आहे याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात प्रकार
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विशेषत:
पाण्यात बुडून मृत्यू होणे,
कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा,
विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे,
उंचावरून पडून झालेला अपघात
सर्पदंश व विंचुदंश
नक्षलवाद्याकडून होणारी हत्या
जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू
येथे क्लिक करून पूर्ण विडिओ पहा व माहिती मिळवा
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ -क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसे ज्या कागदपत्राआधारे ओळख, वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावेत. यासाठी कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.