गणपती बाप्पा मोरया…, श्रीगणेशाच्या जयघोषात ‘मोरया’ का म्हटले जाते? याचा नेमका अर्थ काय?

 

Ganpati Bappa Morya

Ganpati Bappa Morya :

गणपती बाप्पा मोरया… या जयघोषात संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमला आहे. लाडक्या गणरायाचे आगमन लवकरच घरोघरी होईल. १९ सप्टेंबरला श्रीगणेश विराजमान होणार आहे. तर २८ सप्टेंबरला १० दिवसांच्या गणेशाचे विसर्जन होईल.

लाडक्या गणरायाला अनेक नावांनी संबोधले जाते. या दहा दिवसांत गणपतीची विधीवत पूजा अर्चना केली जाते. तसेच लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडीचा मोदक आणि लाडूचा प्रसादही अर्पण केला जातो. परंतु, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? गणपती बाप्पा मोरया…. यातील मोरया हा शब्द आला कुठून, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊया

गणपती या शब्दाचा अर्थ काय?

गणपती (Ganpati) या शब्दातील गण या शब्दाचा अर्थ समूह आणि पती म्हणजे प्रभु असा अर्थ होतो. म्हणजेच गणपतीला समूहाचा स्वामी म्हटले जाते.

बाप्पा या शब्दाचा अर्थ काय?

बाप्पा (Bappa) हे गणेशाच्या इतर नावांपैकी एक नाव. यातून श्रीगणेशाची भक्ती आणि भावना दर्शविले जाते.

मोरया हा शब्द नेमका आला कुठून?

मोरया हा शब्द मराठी असून त्याचा अर्थ जिंकणे किंवा विजय (Success) होणे असा होतो. तर गणपती बाप्पा मोरया या शब्दाचा संपूर्ण अर्थ ‘आमच्या समुहाचा स्वामी भगवान गणेशा, विजयी होवो.’ याच्या उच्चाराने मन शांत होते.

Leave a comment