काय सांगता! आता UPIच्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, पाहा नवी स्मार्ट पद्धत

upi based atm withdrawal

upi based ATM withdrawal :

डिडिजिटल पेमेंटच्या जमान्यातही असे बरेच लोक आहेत जे केवळ रोख रक्कमेने पैसे भरतात. अनेक वेळा असे देखील होते की आपल्याकडे रोख रक्कम नसते आणि आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड देखील विसरतो. अशा स्थितीत, UPI, Paytm किंवा Phone-Pe सारख्या पेमेंट मोडचा अवलंब करतो. पण अजूनही अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक फक्त कॅशच घेतात

.

अशा परिस्थितीत एकदा विचार करा, जेव्हा तुम्हाला फक्त कॅश (Cash) भरावी लागेल आणि तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तेव्हा काय होईल. एटीएम कार्ड नसतानाही तुम्ही एटीएममधून पैसे कसे काढू शकता, आता यूपीआय एटीएम मशीनही आल्या आहेत. देशातील पहिल्या UPI एटीएम मशिनमधूनही तुम्ही पैसे काढू शकता. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रथमच UPI ATM पैसे काढण्याचे मशीन प्रदर्शित करण्यात आले आहे.

जर तुम्ही UPI वापरत असाल तर तुम्ही UPI द्वारे कोणत्याही एटीएममधून सहज पैसे काढू शकता. कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी, तुम्हाला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश सुविधा मिळते, जी तुम्हाला कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची परवानगी देते.

कार्डलेस कॅश काढण्याची ही सुविधा काही निवडक बँकांच्या (Bank) एटीएममध्येच उपलब्ध आहे. यामध्ये बऱ्याच बँकेच्या एटीएमचा समावेश आहे. UPI द्वारे पैसे काढण्यासाठी तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर UPI निवडू शकता.


UPI वापरून ATM मधून पैसे कसे काढायचे?

  • एटीएम मशिनमध्ये गेल्यानंतर स्क्रीनमध्ये कॅश विथड्रॉलचा पर्याय निवडा.
  • आता स्क्रीनमध्ये UPI चा पर्याय निवडा.
  • आता एटीएमच्या स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल.
  • आता तुमच्या स्मार्टफोनवर UPI ओपन करा आणि त्यात Scan वर जा आणि QR कोड स्कॅन करा.
  • आता तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका.
  • आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही कार्डलेसद्वारे 5000 रुपये काढू शकता.
  • आता तुमचा UPI पिन एंटर करा आणि नंतर Proceed वर टॅप करा.
  • आता तुम्हाला मशीनमधून पैसे (Money) मिळतील.

तुम्ही एकाच वेळी 10,000 रुपये काढू शकाल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, क्यूआर कोडद्वारे प्रथमच रोख व्यवहार केला गेला आहे. सध्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत देशभरात सुमारे 700 मशिन्स बसवण्यात येणार आहेत. ग्राहक एका व्यवहारात 10,000 रुपयांपर्यंतची रोकड काढू शकतात.

2 thoughts on “काय सांगता! आता UPIच्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, पाहा नवी स्मार्ट पद्धत”

Leave a comment