घर, कार, शिक्षण किंवा इतर अनेक गोष्टींसाठी आपण कर्ज (Loan) काढतो. कर्जाचे पाहायला गेले तर अनेक प्रकार आहेत. वाढत्या डिजिटायझेशनमुळे सध्या बँकेच्या अनेक गोष्टी सुरळीत झाल्या आहेत. बँकेची इतर अनेक कामे सहज आणि सुलभ पद्धतीने होतात.
बँकेतून रोख रक्कम (cash) काढण्यासह इतर अनेक कामांसाठी बँकेत जावे लागते. परंतु आता बँकेतून कर्ज (loan) घेणे सोपे होणार आहे. बँकेने डिजिटल लोनची (digital loan) सुविधा ग्राहकांसाठी दिली आहे. ज्यामुळे पेपरलेस कर्ज (paperless loan) आपण घेऊ शकतो. यामुळे आपण घेतलेले कर्ज हे सुरक्षित समजले जाते. जाणून घेऊया डिजिटल कर्जाचे फायदे काय आहेत.
डिजिटल कर्जाचे फायदे
बँक (Bank) किंवा इतर कोणत्याही संस्थेत जाण्याची गरज नाही. अशावेळी तुमचा बराच वेळ वाचू शकतो. याशिवाय, या कर्जासाठी अर्ज करणे खूप सोपे आहे ज्यामुळे कर्ज लगेच मिळते.
अर्ज कसा करायचा?
ज्या बँकेतून कर्ज (Loan) घ्यायचे आहे ती बँक निवडा त्यानंतर त्याच्या अधिकृत साइट्सला भेट द्या. अर्ज करताना तुम्ही नाव, पत्ता आणि तुमचे महिन्याचे उत्पन्न याविषयी माहिती द्या याशिवाय, तुम्हाला आधार कार्ड , पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लीप अशी अनेक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीसाठी परवानगी देखील द्यावी लागेल. तुमच्या अर्जानंतर, तुम्हाला मंजूरी मिळताच, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.
डिजिटल कर्ज किती सुरक्षित आहे?
डिजिटल कर्ज हे अगदी सुरक्षित आहे, परंतु ते तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेत आहात यावर देखील अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, कर्जासाठी अर्ज करताना तुम्ही नेहमी अधिकृत वेबसाइट (Website) आणि मोबाइल अॅपचा वापर करावा. सायबर सुरक्षेसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.