तुमचे आधार कार्ड हरवले असेल किंवा अपडेट केलेले असेल व आता तुम्हाला तुमचे नवीन आधार कार्ड पाहिजे असेल तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा, कारण या लेखात आपण आपले आधार कार्ड मोबाईलवर फक्त दोन मिनिटात कसे डाउनलोड करायचे ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
आधार कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड (aadhar card download pdf file) करायचे ? बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा
आधार कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे ? (aadhar card download pdf file)
- प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर uidai.gov.in ही वेबसाईट उघडायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला होम पेजवरच Download Aadhar असा पर्याय दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर Login असा पर्याय तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल
- येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे. त्यानंतर त्याखाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड रिकाम्या जागी टाकायचा आहे.
- त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे. त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला रिकाम्या जागी टाकायचा आहे.
- शेवटी तुम्हाला Login या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्ही तुमच्या आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
- तर अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात आधार कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकता.