आता फ्री रेशन योजना बंद होणार? मोदी सरकार स्वस्‍तात पीठ वाटणार; जाणून घ्या कोणा – कोणाला मिळणार व 10 KG पॅकेटची किंमत

 buy-now-bharat-brand-atta-at-cheap-price

 सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नुकताच दुर्गापूजा-दसर्‍याचा सण पार पडला आणि आता दिवाळी या आठवड्यात येणार आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन वस्तूंच्या महागाईने सर्वसामान्यांना खूप त्रास दिला आहे.


या समस्येतून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी स्वस्त पीठ सुरू केले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने 81.35 कोटी लोकांना मोफत रेशनचा परवठा केला जातो. गेल्या वर्षी सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील, असे म्हटले होते. 

मात्र आता या तारखेपूर्वीच बाजारात स्वस्त पीठ उपलब्ध होईल, असे बोलले जात आहे. गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकार स्वस्त पीठ विकण्यासंदर्भातील योजनेवर काम करत आहे. एका वृत्तानुसार, सरकार भारत ब्रँड अंतर्गत 27.5 रुपये प्रति किलो दराने पीठाची विक्री करेल.

एवढ्या रुपयात पीठ मिळेल

हे अनुदानित पीठ सर्वसामान्यांना 27.50 रुपये प्रति किलो दराने दिले जाईल, जे 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध केले जाईल.

सध्या बाजारात 35 ते 40 रुपये किलो दराने ब्रँडेड पीठ उपलब्ध आहे. अशा स्थितीत सरकारी पिठाची किंमत ब्रँडेड पिठाच्या तुलनेत 8 ते 9 रुपये कमी असेल. जर ब्रँडेड पिठाच्या 10 किलोच्या पॅकेटची किंमत सरासरी 370 रुपये असेल, तर भारत ब्रँडच्या पिठाची किंमत 270 ते 280 रुपये असेल.

 

स्वस्तात पीठ कुठे मिळेल?

पीठ देशातील नागरिकांपर्यंत सहज पोहोचू शकते. यासाठी केंद्र भंडारच्या मोबाईल आऊटलेट्स, NAFED आणि NCCF च्या सहकारी आणि किरकोळ विक्री केंद्रांद्वारे भारत पीठचे वितरण केले जाईल.


Leave a comment