ग्रामपंचायत कडून आपल्याला अनेक प्रकारचे दाखले मिळत असतात. जसे की जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी दाखले, विविध उतारे. पण हेच ग्रामपंचायत चे दाखले तुम्ही आता मोबाईल वर पाहू शकणार आहात. ते कसे पहायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर पहा
ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला Play Store ओपन करून त्यात Mahaegram असे सर्च करायचे आहे. त्या नंतर पहिलेच अँप म्हणजे Mahaegram Citizen Connect (Early Access) हे अँप इन्स्टॉल (install) करायचे आहे. त्या नंतर ते ओपन करायचे आहे.
स्टेप 2: मित्रांनो, अँप ओपन केल्यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्या allow करायच्या आहेत.
स्टेप 3: त्यानंतर नवीन पेज वर तुम्हाला तुमचे नवीन अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी खाली Don’t have account? Register या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.